प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना

नमस्कार, आपण भारत सरकारच्या सरकारी योगणा कोणत्या आहेत, या विषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मागील लेखामध्ये आपण प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योगणा काय आहे? याविषयी डीटेल मध्ये माहिती बगीतली आज आपण त्यामधील दुसरी योगणा प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना काय आहे? हे माहिती करून घेणार आहोत. या योगणेचा उधीष्ट काय आहे? यासाठी अर्ज कसा करायचा एत्यादी विषयी माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

भारत सरकारने 2015 च्या आर्थिक बजेट मध्ये तीन योजनेची घोषणा केली यामध्ये एक प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योगणा, दुसरी प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना आणि लास्ट अटल पेंशन योगणा या तिन्हीही योजनेची सुरवात 9 मे 2015 मध्ये कोलकत्ता येथे करण्यात आली. 

 

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना

 

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना काय आहे?

आज भारतामध्ये खूप लोकांकडे कोणताही अॅक्सिडेंट कवर विमा नाही, व काही लोकांना ते घेणेही परवडत नाही, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना ही या लोकांसाठी खूप कमी पैशा मध्ये उपलब्ध करून दिली आहे.

या योगणेसाठी सहभागी होण्यासाठी तुम्हाला वर्षाला 12 रुपये प्रीमियम भरावा लागतो. 18 ते 70 वर्ष वयोगटातील लोकांसाठी या योगणा उपलब्ध आहे. या योगणेचा कालावधी 1 जून ते 31 मे एक वर्ष आहे. दर वर्षी तुम्हाला ही स्कीम रेंनीव करावी लागते. या स्कीम मध्ये रिस्क कवर 2 लाख रुपये अपघाती मृत्यू आणि कायमचे अपंगत्व, 1 लाख रुपये कायमस्वरुपी थोडे अपंगत्व. 

हे ही वाचा 

कामाचे क्षेत्र काय आहे? 

बँक मध्ये अकाऊंट असणारे 18 ते 70 वर्ष वयोगटातील लोक यामध्ये सहभागी होऊ शकतात. एखाद्या व्यक्तीचे एक पेक्षा जास्त बँक अकाऊंट असतील तर ती व्यक्ती फक्त कोणत्याही एक बँक अकाऊंट मध्ये या योगणेचा लाभ घेऊ शकतो. यासाठी केवायसी म्हणून तुमचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे.

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजने मध्ये रजिस्ट्रेशन कसे करायचे? 

बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये जाऊन तुम्ही पॉलिसीसाठी अर्ज करू शकता. बँक मित्र पण प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेला घर घरी पोहचवत आहेत. किवा तुम्ही विमा एजेंट शी ही संपर्क करू शकता जे सरकारी योगणे विषयी प्लान विकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही https://www.jansuraksha.gov.in/ ला विजिट द्या.

फायदे 

  • ह्या योगणेचा लाभ 18 ते 70 वर्ष वयोगटातील व्यक्ती घेऊ शकते. या योगणेचा वर्षाला प्रीमियम 12 रुपये आहे आणि या प्रीमियम डायरेक्ट तुमच्या बँक अकाऊंट मधून कट होतो.
  • पॉलिसी विकत घेत असताना तुमचे बँक अकाऊंट पॉलिसीला लिंक केले जाते. पीएमएसबीवाय धोरणानुसार, ग्राहक विमा विकत घेतलेल्या मृत्यूचा किंवा अपघातावर अवलंबून असलेल्या व्यक्तीला दोन लाख रुपये मिळतात.
  • विमा खरेदी करणारी व्यक्ती कायमस्वरूपी अपंग झाल्यास त्याला एक लाख रुपयांची रक्कम मिळते.
  • पीएमएसबीवाय योजनेत कोणत्याही वेळी प्रीमियम जमा केला जाऊ शकतो. येथे हे देखील लक्षात घेणे आवश्यक आहे की मे महिन्याच्या अखेरीस बँक खात्यात शिल्लक नसेल तर ही योगणा रद्द केली जाईल.

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना

आज आपण प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना काय आहे? या योजनेचे कामाचे क्षेत्र काय आहे? यासाठी अर्ज कसा करायचा हे बगितले, वर दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल व दुसरीकडे जाण्याची गरज पडणार नाही. यामध्ये तुम्हाला काही बदल किवा शंका असतील तर commend मध्ये जरूर कळवा.

हे ही वाचा 

About The Author

2 thoughts on “प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना”

  1. मी दिलीप खाडे मला ह्या योजनेचा लाभ मिळावा म्हणून युको बँकेत मी ही पॉलिसी सुरू केली होती,कालांतराने जयच्या नावावर पॉलिसी होती त्याचा अपघाती मृत्यू झाला, सदर योजनेचा लाभ मिळावा यासाठी बँकेत अर्ज पण केला,पण बँक विमा देत नाही,ते सांगतात तुम्ही तहसिल किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन सही शिक्के आना,जिल्हाधिकारी कार्यालयात आम्हला किनी सही शिक्के देत नाही,ते सांगता आमचा काही संबंध नाही तुम्ही बँकेतून तसे पत्र तहसील किंवा जिल्हाधिकारी नावाने द्या पण बँक देत नाही ,अरेरावी करत आहेत, देशाचे पंतप्रधान मा मोदींनी गरिबांसाठी ही योजना आखली पण त्याचा लाभ उलट मिळत नसेल तर काय उपयोग,1 महिण्यापासून बँकेत आणि प्रशासकीय कार्यालयात फेऱ्या मारतो आहे,पण काम होत नाही,पुढे काय करावे तक्रार कुठे करावी मार्गदर्शन करावे,धन्यवाद

  2. बँक ह्या योजनेचा लाभ।देत नाही,कृपया मला तक्रार करायची आहे, ती कुठे करावी कळावे.
    9923381898

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *